मेहकर /प्रकाश सुखधाने दिनांक3सप्टेंबर 2024 रोजी मेहकर तालुक्यामध्ये खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व भाई चंद्रशेखर आझाद यांचा देशभर पसरत असलेला झंजावत पाहता. अनेक कार्यकर्ते आझाद समाज पार्टी मध्ये सामील झाले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उस्फूर्तपणे उत्साह व प्रतिसाद पाहायला मिळाला. बुलढाणा जिल्ह्यााात भाई चंद्रशेखर आझाद यांचे हात बळकट करण्यासाठी समाजातील मोठा युवा वर्ग सामोरे सरसावला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश सुखदाने तर या कार्यक्रमा प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून लॉर्ड बुद्धा चे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधनकार कलावंत प्रा. गजेंद्र गवई तसेच कार्यक्रमा चे मुख्य मार्गदर्शक म्हणून भाई सिद्धांत वानखेडे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, संदीप भाऊ गवई तर जिल्हा महासचिव भाई संदीप इंगळे होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले यावेळी सत्कारमूर्ती गजेंद्र गवई साहेब यांनी आपल्या विचारांमध्ये तरुण वर्गाला प्रोत्साहित करून कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्त्याच्या पायाला भिंगरी ,तोंडात खडीसाखर व डोक्यावर बर्फाची लादी असा, असायला हवा .तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांनी आपल्या विचारांमध्ये आज-काल लोक गर्दीकडे जास्त आकर्षित होत असतात. त्यामुळे आपण या ठिकाणी जमला आहात ही गर्दी नसून ही दर्दी आहे आणि आपल्याला दर्दीतला कार्यकर्ता हवा आहे. गर्दीतला नाही तसेच खऱ्या व प्रामाणिक कार्यकर्त्याला सामाजिक कार्य करीत असताना, अनेक संकटे आव्हाने यांना सामोरे जावं लागत असतं. परंतु जो सत्याच्या मार्गावर अविरत चालत असतो. त्याला कशाचीही भीती नसते, सत्य परेशान हो सकता है! लेकिन पराजित नाही. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे यांनी आपल्या विचारांमध्ये केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई प्रकाश सुखदाने यांनी सुद्धा कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या नवयुवकांस शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी बऱ्याच नव युवक कार्यकर्त्यांचा समावेश आझाद समाज पार्टी मध्ये करण्यात आला त्या मध्ये अंकुश गवई ता. संघटक मेहकर, शरद सरकटे ता. महासचिव सिंदखेडराजा, भीमराज काकडे ता. अध्यक्ष युवा आघाडी, कैलास काठोडे जानेफळ जिल्हा परिषद सर्कल, दीपक जाधव मेहकर ता. सदस्य या कार्यक्रमाला अक्षय ताजणे, भानुदास तुपकर, अ.वी.आवारे, प्रकाश मोरे संदीप गवई, सागर गवई ,अजय सरकटे, विवेक सरकटे ,अंकुश गवई शरद सरकटे, तसेच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मेहकर ता. उपाध्यक्ष अमोल भाऊ गवई यांनी केले होते.
