चिखली/ सिद्धार्थ पैठणे तालुक्यातील मौजे खंडाळा मकरध्वज असो सावरगाव डुकरे असो हराळखेड वळती असो अमडापूर येथील बौद्ध स्मशानभूमीचे प्रकरण ज्वलंत असता आज दिनांक 5 9 2024 रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार चिखली व पोलीस निरीक्षक चिखली यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रथम तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा समूह तहसील कार्यालय चिखली येथे जमून त्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले व तालुक्यातील मौजे खंडाळा येथील शासनाचा तहसीलदार यांचा आदेश दिनांक 1982 नुसार 0.04 एकर जमीन बौद्ध स्मशानभूमीसाठी नोंद करून सौंदर्यकरणासह व स्मशानभूमीचे बांधकामासाठी तात्काळ करा असे निवेदन तहसीलदार मार्फत दिले आहे सदर निवेदन एक एक करून न देता तालुक्यातील सर्वच गावांचा प्रश्न मार्गी लावा या भूमिकेसाठी माननीय प्रदीप अंभोरे भूमी मुक्ती मोर्चा सहकारी सिद्धार्थ पैठणे भाई दीपक कस्तुरे भाई विजयकांत गवई भीमराव भिसे विजय चव्हाण दीप दीपक साळवे रवींद्र अंभोरे सलीम भाई रवींद्र साळवे सह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत
