बुलढाणा /सचिन खंडारे या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी केवळ पिकाला पोषक असाच पाऊस पडल्याने तलाव व धरण साठ्यात पाहिजे तशी वाढ झाली नाही . तीन महिन्यांत ७६:६७ टक्के पाऊस पडूनही तलाव साठ्यात केवळ ५० टक्के पेक्षा कमी पाणी आल्याने रब्बी पिकासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे .
साखरखेर्डा परिसरासह तालुक्यात दररोज ढगाळ वातावरण निर्माण होते . परंतू पाहिजे तसा दमदार पाऊस पडत नाही . केवळ रिमझिम पावसाच्या सरी पडून पिकाला पोषक वातावरण तयार होते . नदी , नाले , ओढे कोठेही दुथडी भरून वाहत नाही . विहीरीची पाणी पातळी वाढली असली तरी तलाव मात्र ५० टक्के पेक्षा कमी भरलेले आहेत . तालुक्यातील विद्रूपा धरण विदर्भ मराठवाडा सिमेवर आहे . या धरणात मराठवाड्यातील शेवली भागात पाऊस पडला तरच पाणीसाठा येतो . मराठवाड्यात दमदार पाऊस पडत असताना शेवली भाग याला अपवाद ठरला आहे . केशव शिवणी तलाव , मांडवा तलाव , हनवतखेड , हिवरा गडलिंग , राजेगाव , साखरखेर्डा येथील महालक्ष्मी आणि गायखेडी तलाव , एकांबा तलाव , शिंदी येथील तलाव आजही भरले नाहीत . जुनं महिन्यात सरासरी पेक्षा खुपचं कमी पाऊस झाला . जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली परंतू एकदाही नदी , नाले , ओढे खळबळ वाहिली नाही . ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस पडून नदी , नाले एक होऊन वाहतील . परंतू ते स्वप्न अधुरेच राहिले . मूग शेतकऱ्यांच्या घरात आला . उडीदाची तोड सुरु आहे . सोयाबीन चांगले बहरले आहे . शेंगा परिपक्व झालेल्या आहेत . कपाशीला फुल धारणा होत आहे . एकूण पिकाची परिस्थिती चांगली आहे .
साखरखेर्डा , मेरा बु . हिवरा आश्रम आणि कोलारा , काटोडा ही मंडळे कोराडी प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात येतात . यावर्षी या पानलोट क्षेत्रात एकदाही दमदार पाऊस पडला नसल्याने भोगावती आणि कोराडी नदीपात्रात एकदाही दुथडी भरून वाहते झाले नाही . त्यामुळे कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली नाही .
———————————————————
सिंदखेडराजा तालुक्यात तीन महिन्यांत ६१४:८ मी मी पाऊस ( ७६:६७ )
सिंदखेडराजा तालुक्यातील सात मंडळात तीन महिन्यांत सरासरी पडलेला पाऊस
१) सिंदखेडराजा – ५२१ मी मी
२) किनगावराजा – ४७८ मी मी
३) मलकापूर पांग्रा – ५७७ मी मी
४) दुसरबीड – ३६४ मी मी
५) सोनुशी – ४०९ मी मी
६) शेंदुर्जन – ५०९ मी मी
७) साखरखेर्डा – ४९१ मी मी
पावसाची नोंद झाली आहे .