https://vruttamasternews.com/buldhana-news-n/
शेलगाव जहागीर / अन्वी मुरूम उत्खनन….
सार्वजनिक बांधकाम उप विभाग उपविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
चिखली/सिद्धार्थ पैठणे
तालुक्यातील मौजे शेलगाव जहागीर अन्वी गट ग्रामपंचायत असून गेल्या चार महिन्यापूर्वी प्रा. सुनील गि नाजी इंगळे व इतर यांनी मुरूम उत्खनन केल्याची लेखी तक्रार तहसील कार्यालय चिखली येथे सादर केली होती
याबाबत सविस्तर वृत्त असे की
गेल्या चार महिन्यापूर्वी शेलगाव जहागीर आन्वी गट ग्रामपंचायत असून तेथे सचिव व सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी संगणमत करून विनापरवाना मुरूम टाकण्याची तक्रार चिखलीतहसील कार्यालयात दाखल केली होती सदर तक्रारीची दखल चिखली कार्यालयात तहसील सार्वजनिक उपविभाग यांना दोन वेळा पत्रव्यवहार केला परंतु दोन्ही वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त वेळ काढून नेण्याचे धोरण अवलंबले व त्यामुळे अर्जदारास नाहक त्रास झाला आहे एकीकडे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या वर सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिखलीचे श्री चिंचोले नाहीत का त्यांना या कार्यवाही करण्यामागे कुठली भीती आहे का थांबवल्या येते हा प्रश्न अजूनही अर्जदारास पडलेला आहे संबंधित कार्यालयाने दोन वेळेस लेखी पत्र व समजपत्र देऊनही जर चिखली उपविभाग काम करत नसेल तर यांना काम करण्यापासून कोण थांबवतो असा प्रश्न होत आहे याबाबत आता अर्जदाराने सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा येथे लेखी तक्रार देऊन या तक्रारीची एक प्रत मुंबई कार्यालयातही पाठवली असल्याचे कळते खात्रीशीर वृत्ताकडून कळत आहे या याबाबत श्री चिंचोले यांच्याशी संपर्क साधला असता मी आमचे शाखा अभियंता यांना बोलून सांगतो तर गेल्या आठ दिवसापासून त्यांना बोलण्यासही वेळ नाही असे दिसून येत आहे तर एकीकडे तहसील कार्यालयाच्या या आदेशाला जणू श्री चिंचोले यांनी केराची टोपली दाखवल्याचे कळत आहे