https://vruttamasternews.com/jalna-news/
महिलांचा सन्मान वाढवून शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे .
………………………,…..
ज्ञानेश्वर शेजुळ यांची प्रतिक्रिया.
…………………………….
जालना (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांनी आज विधिमंडळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून हा राज्यातील महिलांचा सन्मान वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हाअध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून या योजनेमध्ये वीस ते साठ वर्षे पर्यंतच्या सर्व महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे यामुळे राज्यातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ज्ञानेश्वर शेजुळ यांनी म्हटले आहे.
तसेच प्रत्येक ग्राहकांना वर्षभरात तीन या सिलेंडर मोफत देण्यात येणार असून राज्यातील कृषी पंप धारकांना 7.5 हॉर्स पावर च्या पंपापर्यंत थकीत विज बिल माफ करण्यात येणार असून त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 12 तास पूर्ण क्षमतेने वीज देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना मागील त्याला सौर कृषी ऊर्जा पंप देण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असल्याचे ज्ञानेश्वर शेजुळ यांनी म्हटले आहे.
तसेच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने राज्यातील शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे सुद्धा राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री मा.ना. अजित दादा पवार यांनी जाहीर केले आहे.
तसेच राज्यातील मुलींच्या शिक्षणामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने यापुढे सर्वच मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण मोफत करण्याचे सरकारने ते धोरण असल्याचे या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले आहे तसेच राज्यातील मुलींच्या शिक्षणासाठी परीक्षा शुल्क आणि परीक्षा फीस पूर्णपणे माफ करण्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्यामुळे हा अर्थसंकल्प महिलांचा आत्मसन्मान वाढवणारा असून शेतकऱ्यांना प्रगतीशीच्या दिशेने येणारा असल्याची व या अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत होत असल्याची प्रतिक्रिया भाजपा किसान मोर्चा जालना जिल्हाअध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर पाटील शेजुळ यांनी दिली आहे.