अंबड/ प्रतिनिधी:- शहरातील बाबर नगर येथील समाजसेवक व दैनिक वृत्त रत्नं सम्राटचे पत्रकार धर्मराज तात्याराव बाबर यांना १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करत हॉकी स्टीक आणि लोखंडी गजने प्राण घातक मारहाण करून जीवे मारण्याची दिली धमकी.या संदर्भात अधिक माहिती अशी की दैनिक वृत्तरत्न सम्राट वृत्तपत्राचे पत्रकार व समाजसेवक धर्मराज तात्याराव बाबर ( वय -४० ) वर्ष रा.बाबर नगर अंबड जि.जालना हे कामानिमित्त पंचायत समिती समोरील महालक्ष्मी टी हॉटेल समोर थांबले असताना सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास नगरसेवक गंगाधर मच्छींद्र वराडे,राम वराडे मेकॅनिक व त्याच्या सोबत तिन गुंड लोक हातात हॉकी स्टीक आणि लोखंडी गज घेऊन आले नगरसेवक गंगाधर वराडे यांने जुनी गॅस एजन्सी जवळील नालीच्या बांधकामातील मला दहा लाख रुपये दे अशी खंडणीची मागणी केली तेव्हा मी त्यास म्हणालो पैसे देवू शकत नाही असे उत्तर देताच नगरसेवक गंगाधर वराडे यांने हातातील हॉकी स्टीक आणि राम वराडे मेकॅनिक याने लोखंडी गजने पाठीवर व डोक्यावर प्राण घातक गंभीर दुखापती केली व अनोळखी तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली नगरसेवक गंगाधर वराडे मला जर तु पैसे दिले नाही तर तुझ्या परीवारासहीत तुला जिवंत मारुण टाकील अशा धमक्या दिल्या.नगरसेवक गंगाधर वराडे,राम वराडे मेकॅनिक व त्यांच्या सोबत आलेल्या तिघावर अंबड पोलीस ठाण्यात उशिरा रात्री ०१ वाजता भादवी कलम ११८(१),१८९(२),१९०,१९१(२),१९१(३),३५१(२),३५१(३),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश जाधव,सह संदिप कड हे करत आहे
