Jalna news कु.अनिता काकडे दिल्ली ला स्वतंत्र दिनी  आमंत्रित पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते ध्वजारोहनाला राहणार उपस्थित

https://vruttamasternews.com/jalna-news-2/

कु.अनिता काकडे दिल्ली ला स्वतंत्र दिनी

आमंत्रित

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते ध्वजारोहनाला राहणार उपस्थित

 

जालना / रामदास कहाळे

जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद हायस्कूलची विद्यार्थिनी कु. अनिता आसाराम काकडे वर्ग 10 वा. रा.दरेगाव हिचा भाजपा किसान मोर्चा चे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला आहे.

देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील ध्वजारोहण कार्यक्रमाला कु. अनिता आसाराम काकडे हिला केंद्र सरकारने विशेष निमंत्रण पाठविले आहे. आणि कु. अनिता काकडे ही नवी दिल्ली येथील ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

दिनांक 13/0 8 /2024 रोजी कु. अनिता काकडे ही सेवलीहुन नवी दिल्लीकडे रवाना होणार आहे.

जालना तालुक्यातील शेवली भागाच्या दृष्टीने हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याने श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी जिल्हा परिषद हायस्कूल शेवली येथे जाऊन कु.अनिता काकडे हिचा शाल आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार केला, कु.अनिता काकडे अभिनंदन केले आहे.

आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती प्रेरणा लोंढे मॅडम, वर्गशिक्षक श्री राजकर सर यांनी या मुलीच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले आहे.

यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल शेवली येथील शिक्षक सर्वश्री पी. आर. जाधव सर,श्री डी.बी. पालवे सर, श्री जि. बी. भुतेकर‌ सर, श्री एस. एल. जोशी सर, श्री डि.जि. शिंदे सर, श्री इम्रान पठाण सर, श्री डि. व्ही. आत्रम सर, श्री अशोकराव काकडे दरेगाव, फिरोज भाई, आणि शबाब भाई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *