https://vruttamasternews.com/jalna-news-558-2/
माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे
सेवली येथे आ. लोणीकरांच्या हस्ते मोफत नोंदणी शिबिराचे उद्घाटन होणार.
सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा…
ज्ञानेश्वर शेजुळ यांचे आवाहन..
जालना /प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक चांगले आणि लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील.
राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत चांगली योजना जाहीर केली आहे.
या योजनेचे सर्व स्तरातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
या योजनेच्या नोंदणीसाठी जालना तालुक्यातील सेवली येथे दिनांक 23 जुलै 2024 रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजता सिद्धमाता मंदिर सेवली ता. जि. जालना येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माझा लाडका भाऊ योजना, आणि माझी लाडकी मुलगी म्हणजेच सुकन्या योजना या योजनेच्या मोफत नोंदणीसाठी राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा नेर आणि सेवली सर्कल मधील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेची नोंदणी करावी आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा किसान मोर्चा चे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांनी केले आहे.
या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा.श्री बबनरावजी लोणीकर यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. श्री राहुल भैया लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरामध्ये नोंदणी करण्यासाठी शासनाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या शिबिरासाठी तहसीलदार जालना श्रीमती छाया पवार, जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संदीप पवार , महिला आणि बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच दोन्ही सर्कल मधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, आशा वर्कर हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच या शिबिरासाठी शेवली आणि नेर सर्कलमधील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य, गावागावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
तरी परिसरातील सर्व नागरिकांनी जागरूकपणे आपापल्या गावातील महिलांची नोंदणी या शिबिरामध्ये करून घ्यावी असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केले आहे.