https://vruttamasternews.com/jalna-news519-2/
काळी पिवळी विहिरीत पडून सहा जणांचा मृत्यू
जालना/प्रतिनिधी
प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. दुचाकीला वाचवताना टॅक्सी थेट विहिरीत कोसळलीये. यात बारा प्रवासी होते जे की पंढरपूर याठिकाणाहून परतत होते. जालन्याहून एका टॅक्सीने ते गावाकडे निघाले होते. मृतांमधील चनेगाव आणि तुपेवाडी याठिकाणचे हे रहिवासी होते. पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोध कार्य सुरु आहे. घटनास्थळावर जिल्हाधिरी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फोजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले आहेत. प्रल्हाद महाजन, ताराबाई मालुसरे, नंदा तायडे, प्रल्हाद बिटले, नारायण किसन निहाळ, चंद्रभागा घुगे अशी मयताची नावे आहेत.