https://vruttamasternews.com/loksabha-elections-news-235-2/
एक मतदारसंघ वगळता एससी एस टी च्या सर्व लोकसभा मतदासंघ महविकास आघाडी कडेच
2024 लोकसभा ( ST) व दलित ( SC) महाविकास आघाडी व विशेषतः काँग्रेसच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र राज्यातील नऊ राखीव मदारसंघांची स्थिती .
आदिवासी मतदरसंघ स्थिती………….
महाराष्ट्रात चार आदिवासी राखीव मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत चारही भाजप प्रणित महायुतीकडे होते. आता तीन महा विकास आघाडी कडे आली आहेत. आदिवासी काँग्रेस कडे परत आले आहेत असे महाराष्ट्रात तरी दिसते.
चार पैकी दोन ठिकाणी काँग्रेस , एक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तर एक ठिकाणी भाजप विजयी झाले आहेत.
महाराष्ट्रातील चार आदिवासी राखीव मतदारसंघ आणि निवडून आलेले उमेदवार आणि मिळालेली मते…..
1)नंदुरबार ऍड.गोवाल पाडवी ….काँग्रेस आय.
2) दिंडोरी ( जिल्हा नाशिक ).
भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार.
3) गडचिरोली ( चिमूर ) – डॉ.नामदेव किरसान ….काँग्रेस आय.
4) पालघर – डॉ.हेमंत सावरा….भाजप.
B ) आता महाराष्ट्र मधील अनुसूचित जातीच्या ( SC ) मतदरसंघांची स्थिती बघुयात ……
महाराष्ट्रातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील दलित ( अनुसूचित जाती) मतदारसंघांची स्थिती…..
महाराष्ट्रात एकूण 5 अनुसूचित जाती चे मतदारसंघ आहेत. ती मतदारसंघ व निवडलेले उमेदवार बघता असे स्पष्ट होते की त्यापैकी चार मतदरसंघ काँग्रेस कडे आलेले आहेत नी एक मतदरसंघ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेला आहे. याचा अर्थ पाचही मतदरसंघ महा विकास आघाडी कडे आलेले असून भाजप प्रणित महा युतीला एकही मतदरसंघ मिळाला नाही. दलित मतदार काँग्रेस कडे वळला आहे हेच यातून दिसते.
वर्षा गायकवाड ह्या अनुसूचित जातीच्या असून त्या उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेस आय मधून खुल्या जागेवर विजयी झाल्या आहेत….!
याचा अर्थ एकूण सहा अनुसूचित जातीच्या विजयी उमेदवार पैकी पाच उमेदवार चक्क काँग्रेस चे आहेत …..!!*
उमेदवार व मतदारसंघ खालील प्रमाणे…..
1) रामटेक ( SC) – श्याम कुमार बर्वे – काँग्रेस आय.
2) लातूर( SC) – शिवाजीराव कळगे – काँग्रेस आय.
3) सोलापूर ( SC)- प्रणिती शिंदे – काँग्रेस आय.
4) अमरावती( SC) – बळवंत वानखेडे – काँग्रेस आय.
5) शिर्डी( SC) – भाऊसाहेब वाकचौरे – शिवसेना उद्धव ठाकरे.
6) उत्तर मध्य मुंबई ( खुला ) वर्षा गायकवाड – काँग्रेस आय….
एकुणात असे की
महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमाती चे लोकसभेचे एकूण नऊ राखीव मतदार संघ असून त्यापैकी सहा काँग्रेस कडे , एक राष्ट्रवादी शरद पवार , एक शिवसेना ठाकरे तर केवळ एकच भाजप कडे आलेले आहेत.
म्हणजे नऊ दलित – आदिवासी मतदरसंघांपैकी चक्क आठ महा विकास आघाडी कडे तर केवळ एकच भाजप प्रणित महायुतीकडे आलेले आहेत….!
दलित – आदिवासी मतदार जेव्हाही काँग्रेस कडे वळतो तेंव्हा काँग्रेसला अच्छे दिवस येतात
अर्थात त्याचे भान काँग्रेसने राखले पाहिजे हीच अपेक्षा