https://vruttamasternews.com/mumbai-news/
महायुतीच्या होऊ घातलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात रिपाई आठवले गटाला सामील करावे – जिल्हाकार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव
बुलडाणा,(प्रतिनिधी )- रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा.रामदास आठवले हे भाजप सोबत महायुती मध्ये गेल्या दहा वर्षा पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सक्रिय राजकारणात आहेत, त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विविध राज्यात जाऊन झंझावाती प्रचार केला त्या मुळे मागासवर्गीय समाजाचे मते महायुतीकडे वळले आणि गोर गरीब , शोषित पीडित कष्टकरी समाज आठवले सहेबांसोबत रिपाईच्या माध्यमातून महायुती सोबत उभा केला. त्यामुळे पंतप्रधान मोदीजींनी जे विकासांचे धोरण आखले ते तळागाळा पर्यंत रामदासजी आठवले यांनी पोहचविले व त्यांच्या नेतृत्वात रिपाईच्या सर्व कर्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार केला व जास्तीत जास्त मागासवर्गीयांचे मते महायुतीला मिळवून दिली व आज रोजी जे यश दिसत आहे ते रामदासजी आठवलेंच्या स्टार प्रचारकाचे व रिपाई कार्यकर्यांची मेहनत आहे. महायुतीच्या व भाजपच्या जून्या मित्र पक्षाला होऊ घातलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राचे नेते आविनाशजी माहातेकर, प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे,कार्यध्यक्ष बाबुरावजी कदम, दौलत खरात, ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, राष्ट्रीय सचिव दयाल बाहादूरे यांना युती धर्माप्रमाणे रिपाईच्या कार्यकर्त्याला मंत्रीमंडळात समाविष्ट करावे व महाराष्ट्र राज्याचे महामंडळ आहे त्या महामंडळात रिपाई आठवले यांना युतीधर्म, जूना मित्र धर्म पाळून सर्व राज्यातील तालुका, जिल्हा, राज्य पतळीवरील शासनाच्या कमेट्यांवर युती धर्मात ठरल्या प्रमाणे प्रतिनिधीत्व द्यावे असी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणवीस, उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार, भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांचे कडे बुलडाणा जिल्हा माजीध्यक्ष तथा रिपाई कार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी निवेदनाव्दारे केली आहे