Mumbai news सिद्धार्थ खरात यांच्या  प्रशासकीय सेवेला अखेर पूर्णविराम ..!!

https://vruttamasternews.com/mumbai-news-2/

सिद्धार्थ खरात यांच्या

प्रशासकीय सेवेला अखेर पूर्णविराम ..!!

 

मंत्रालयीन कक्ष अधिकारी ते सहसचिव व केंद्रांसह राज्यातील विविध मंत्रीमहोदयांकडे स्विय सहाय्यक (पी.ए.) ते खाजगी सचिव (पी.एस.) अशा विविध पदावर प्रो- ॲक्टीवली , नाविन्यपूर्ण , निष्कलंक व बेदाग अशी ३० वर्षाची सेवा पूर्ण करून दिनांक १ जुलै २०२४ पासून स्वेच्छा सेवानिवृत्ती (VRS ) घेतली आहे..

ताडशिवणी सारख्या दुर्गम खेड्यापासून सुरू झालेला हा  प्रवास महाराष्ट्राचे पॅावर हाऊस असलेल्या मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचला ..

या कालावधीत सार्वजनिक बांधकाम , ग्राम विकास , आरोग्य , उच्च व तंत्र शिक्षण व गृह ( बंदरे) इत्यादी विभागात अनेक महत्वपूर्ण निर्णय , धोरणे , मंत्रीमंडळ प्रस्ताव , नवीन कायदे , शासन निर्णय , स्टॅचुट्स, आदेश , प्रशासकीय व कायदेविषयक सुधारणा अशा सार्वजनिक हिताच्या एक ना अनेक बाबी करतांना प्रत्यक्ष सहभागी होऊन पुढाकार घेता आला..

नविन कायदे, विधि विद्यापीठे , स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठे निर्माण करत असतांना सुमारे ७०-८० मंत्रीमंडळ प्रस्ताव त्यांच्या  हातून सादर करता आले

 

विविध मंत्रीमहोदयांकडे काम करतांना सामान्य नागरिकांच्या प्रती काम करतांना मोलाचा अनुभव मिळाला ..

 

या संपूर्ण कालावधीत वेळेवेळी मार्गदर्शन करणारे , वरिष्ठ , सहकारी , मित्र परिवार व कुटुंबियांचा भक्कम पाठींबा व समर्थ साथ यामुळेच हे शक्य झाले.

 

त्यामुळेच पुन्हा पुन्हा आपल्या मातीकडे व माणसांकडे पाय वळत राहीले..

 

दुष्काळग्रस्त होते कणसात चार दाणे

पक्षी मला उपाशी हुसकावता न आले

अवघीच जिंदगी मग झाड होत गेली

मातीत पाय रूतले ते काढता न आले .!!!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *