https://vruttamasternews.com/mumbai-news-20/
अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत 5 आमदाराची दांडी
मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामधील कारणे दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने लोकसभेत राज्यभरात दहा जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी आठ जागावर शरद पवार गटाचे उमेदवारांचा विजय झालाय तर अजित पवार गटाला केवळ रायगडच्या जागेवर विजय मिळाला आहे तसेच राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल आहे या निवडणुकीनंतर लगेच सहा महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे राज्यातील नागरिकांचा सध्याचा मुढ बघता महाविकास आघाडीच्या दिशेने आहे त्यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता असल्याची माहिती समोर येत आहे
अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराची आज बैठक बोलावली होती त्या बैठकीला पाच आमदार गैरहजर होते अशी माहिती समोर आली आहे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा आता पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जातो त्यामुळे अजित पवार गटात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत अजित पवार गटाच्या आमदाराची आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली होती त्यानंतर सर्व आमदाराची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली या बैठकीला पाच आमदारांची अनुपस्थिती होती त्या पाचही आमदाराने आपली कारणे पक्षाच्या वरिष्ठांना कळल्याची माहिती समोर येत आहे पण आमदाराच्या अनुपस्थितीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे
अजित पवारांच्या बैठकीत कोण कोण अनुपस्थितीत अजित पवाराच्या गटा च्या आमदाराची आज बैठक पार पडली या बैठकीला पाच आमदार उपस्थित नव्हते मिळालेल्या माहितीनुसार आमदारांना नरहरी झिरवळ ,सुनील टिंगरे डॉ .राजेंद्र शिंगणे अण्णा बनसोडे, धर्मराव बाबा आत्राम या आमदाराची बैठकीत अनुपस्थिती राहिली मंत्री पदाचा विस्तार आता लवकरात करावा अशी चर्चा बैठकीत जाण्याची माहिती क्षेत्राकडून मिळत आहे लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या अपयशाबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.
बारामती च्या खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्याने अजित पवार गटाच्या काही आमदारांनी मेसेज करून अभिनंदन केल्याची चर्चा राज्यभर जोरात सुरू असताना मात्र त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदार गैरहजर राहिल्याने या चर्चेला उधाण आले आहे