https://vruttamasternews.com/mumbai-news-439-2/
मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडी ला मतदान करूनही विधान परिषदेत उमेदवार न दिल्याने राजीनामा
मुंबई /प्रतिनिधी
महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार उभा न केल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव Abdul Hafeez Abdul Raheman यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. 90% मुस्लिमांनी INDI युतीला मतदान केले, MVA ने मराठवाड्यात 8 पैकी 7 जागा जिंकल्या पण काँग्रेसने MLC साठी एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नाही, मात्र OBC पार्श्वभूमी असलेल्या आणि MVA विरुद्ध काम केलेल्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे.
अब्दुल हाफिज साहेबांनी आपला राजीनामा थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.