https://vruttamasternews.com/mumbai-news-7/
फादर सुसाई इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन साजरा
मुंबई (प्रतिनिधी) दिनांक १५ आॉगस्ट २०२४ आज आपण आपल्या देशाचा ७८ स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. दि महाराष्ट्र एज्युकेशन अन्ड वेल्फेअर ट्रस्ट संचालित ‘फादर सुसाई इंग्लिश स्कूल’ औद्योगिक वसाहत कांदिवली पश्चिम मुंबई येथे साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिलाषा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री बसंत मालवत, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी संस्थेचे विश्वस्त पुनिथा फादर सुसाई , शोभा, मॅडम, कवी पत्रकार मधुकर गवई शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.आजचा दिवस आपल्यासाठी केवळ आनंदाचा नाही, तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण देणारा आहे. त्यांच्या पराक्रमामुळे आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगतो. चला, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आपण एक सशक्त, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्याचा संकल्प करूया.