मुंबई (विशेष प्रतिनिधी ) महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानस्पद संसद मध्ये भाषा वापरून खिल्ली उडविली याबद्दल मालवणी मालाड पश्चिम मुंबई येथील आंबोजवाडी माता रमाई भाजी मार्केट ते मालवणी गेट क्रमांक 1 या ठिकाणी दिनांक 22 /12/2024 रोजी संविधानिक मार्गाने संविधान कृती समिती च्या वतीने निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता याबाबत, मालवणी पोलीस ठाणे कडून रीतसर परवानी सुद्धा घेण्यात आली होती, मात्र यामध्ये आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल मी एकट्याने सदर कृत्य केलेले नसून यामध्ये सोशल मीडिया च्या माध्यमातून कुणी काय केल ते सर्व व्हिडिओ चित्रीकरण पोलीस कर्मचारी ते मीडिया माध्यम व जनतेने व्हायरल केलेली आहेत मात्र शेकडोच्या मोर्च्यात केवळ मला व शंकर वाकडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले गेले असून पी एस आय प्रफुल मासाळ यांनी मला यापूर्वी एका खोट्या गुन्ह्यात अडकविले असून गुन्हा नोंदविताना कुठलीही चौकशी न करता सदर गुन्हे अकसा पोटी दाखल केले असून फ्रफुल मासाळ यांनी मला यापूर्वीच्या गुन्ह्यात पैशाची मागणी केली असून मी नाही दिल्यामुळे मलाच या मोर्चामध्ये नाहक मानसिक त्रास देण्याचे ठरविले असून या बाबत माझ्याकडे वारंवार कॉल करून मानसिक त्रास देण्याचे काम फ्रफुल मासाळ करत असून सदर, पोलीस निरीक्षक प्रफुल मासाळ व पोलीस कर्मचारी रामदास चव्हाण यांची सी आय डी मार्फत चौकशी करून नार्को टेस्ट करण्यात यावी आमचे राजकीय व सामाजिक जीवन उधवस्त कुणाच्या ईशाऱ्यावरून करण्यात आले हे नार्को टेस्ट मध्ये सिद्ध होईल अन्यथा मी अन्न त्याग आंदोलन मालवणी पोलीस ठाणे समोर करणार असून याबाबत पोलीस उपायुक्त,बोरिवली,पोलीस आयुक्त मुंबई,पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, पोलीस प्राधिकरण मुंबई, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती भारतसरकार, यांना लेखी निवेदना द्वारे मागणी केली असून आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ऍड भाई चंद्रसेखर आजाद रावण, वंचित बहुजन आघाडी चे नेते श्रदय, प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेने चे अध्यक्ष,आनंदराज आंबेडकर,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे,दीपक केदार, बहुजन युथ पॅन्थर चे अध्यक्ष भाईसाहेब जाधव, काँग्रेश चे नाना पटोले, वर्षा गायकवाड, भीमशक्ती चे खासदार चंद्रकांत हंडोरे,प्रहार चे बच्चूभाऊ कडू, राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड,स्थानिक आमदार अस्लम शेख यांना निवेदन मेल द्वारे देण्यात आले आहे व लवकरच उत्तर मुंबई मध्ये सदर गुन्हे खारीज करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम व मोठे जनआंदोलन करण्यात येईल असे सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाना कळविले आहे,
