बौद्ध धम्म परिषदेमध्ये धनगर टाकळी येथील सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांचा सत्कार….!

पूर्णा परभणी/ प्रतिनिधी 1 फेब्रुवारी 2025 धम्म परिषदेचा दुसरा दिवस दक्षिण कोरिया येथील भिक्खू यांची उपसंपदा धनगर टाकळी येथील बुद्धकालीन पार्श्वभूमी असलेल्या जिल्हा दक्षिण भारतातील गंगा असे संबोधले जात.

अशा गोदा पत्रातील बेटावर हा उपसंपदा विधी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोदापत्रातील बेटावर विधिवत संपन्न झाला.

धनगर टाकळी येथे दक्षिण कोरिया येथील भिकु गण व भारतातील भिकू गण ज्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण कोरिया येथील बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. ली ची रॅन भदंत डॉ. करुणानंद महाथेरो भदंत डॉक्टर इंदवश महाथेरो प्रोफेसर डॉक्टर एम सत्यपाल भदंत ज्ञानरक्षित महाथेरो विपश्यनाचार्य पय्या रत्न महाथेरो भदंत प यानंद महाथेरो भदंत धम्मशील महाथेरो भदंत पैयातीस थेरो आदीसह डॉ. नितीन साळवे धम्माचल अजिंठा चे ट्रस्टी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आदमाने आदींची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या व बौद्ध समाजाच्यावतीने फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये बँड पथकाच्या निनादामध्ये भिक्खू संघावर पुष्पवृष्टी करून शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.

सर्वधर्मसमभाव व सामाजिक ऐक्य आपसी भाईचारा हे मानवतावादी मूल्य धनगर टाकळी ग्रामस्थ नेहमीच जपत आलेले आहेत.

अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उप गुप्त महा थेरो यांना गावच्या सरपंच मिराताई साखरे त्यांचे पती प्राध्यापक सैनाजी माटे उपसरपंच शेख मगदूम साब नांदेड येथील एमजीएम जर्नालिझम कॉलेजचे प्राचार्य दैनिक लोकपत्र आवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी तंटामुक्ती ग्राम चे अध्यक्ष गोरखनाथ साखरे माजी सरपंच नरहरी साखरे गोदावरी शिक्षण संस्थेचे संचालक माजी मुख्याध्यापक भगवान पाटील गावामध्ये धार्मिक कार्यामध्ये तत्पर असलेले आदर्श शिक्षक पप्पू ढगे ग्रामपंचायत सदस्य मधुकर ढगे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर ढगे चंद्रकांत ढगे

व महिला मंडळांनी स्वागत समारंभाची तयारी केली.

धनगर टाकळी या ठिकाणी झालेल् अतिशय भव्य व दिव्य प्रमाणात भिक्खू संघाचे स्वागत यामुळे दक्षिण कोरिया व भारतातील भिकू संघ भारावून गेला.

यामुळे धम्म परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी सरपंच उपसरपंच व गावकरी यांना धम्म परिषदेमध्ये सन्मानपूर्वक निमंत्रित करून धम्म परिषदेची लूंबिनी स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.

यावेळी वंदनीय भिकू संघासह ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे कामगार नेते अशोक व्ही कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड इंजिनीयर पीजी रणवीर आदर्श शिक्षक गौतम वाघमारे किशोर ढाकरगे अतुल गवळी श्रीकांत हिवाळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *