कचरा वेचणाऱ्या मुलीने मागितले बाप बदलणारा मानुस या पुस्तकाच्या मागणीने सर्वच झाले आश्चर्यचकित

पुणे/ प्रतिनिधी पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक खरेदीसाठी जमलेल्या सुशिक्षित, नोकरदार,अधिकारी वाचकांच्या गर्दीमध्ये कोणतरी एक मुलगी कचरा गोळा करते, याकडे कोणाचं लक्ष ही नव्हतं, पण त्या कचरा गोळा करणाऱ्या हातांचं लक्ष मात्र आपलं जग बदलणाऱ्या बापमाणसाकडे होतं. आज पुणे पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस आणि कचरा गोळा करता करता ही ताई स्टॉल वरच्या मुलाला म्हणाली की ‘हे बापमाणूस पुस्तक मला पाहिजे, केवढ्याला आहे?’ पुस्तक महोत्सवातील सगळा वाचकवर्ग उच्चभ्रू , सुशिक्षित लोकं, पुस्तक खरेदीसाठी उडालेले गर्दी यामध्ये या ताईचे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले.

 

माझ्या मनात आलं “पुस्तक महोत्सवात येऊन गेलेले सारे सेलिब्रिटी एका बाजूला आणि या वाचक ताईंच्या मनातली ही वाचनाची ओढ एका बाजूला..,” एका हातात कचरा टाकायची पिशवी आणि दुसऱ्या हातात बापमाणूस घेऊन उभा राहिलेले ही ताई दिसली, तेव्हा माझ्या डोळ्यात आपोआप आश्रू दाटले… पुस्तक महोत्सवात जग_बदलणारा_बापमाणूस ग्रंथदालनास भेट दिलेली ही सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहे❤️

 

 

धन्यवाद

 

पुस्तकं वाचणाऱ्या मुली !

 

जग_बदलणारा_बापमाणूस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *