Pune news बाजार समितीच्या कर्मचारी यांचे वेतन देण्यात यावे

https://vruttamasternews.com/pune-news-685-2/

बाजार समितीच्या कर्मचारी यांचे वेतन देण्यात यावे

पुणे/ प्रतिनिधी

स्थानिक पुणे येथे पणन संचालनालय कार्यालयात श्री सचिनजी सातपुते अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांचे नेतृत्वात पणन संचालक यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद राज्यातील बाजार समित्यांचे सचिव केडर शासनाच्या विचाराधीन असल्याच्या हालचालीवरून सचिव केडर सह शिपाई ते सचिव पदाचा सामावेश करण्यात यावा.तसेच दिवसेंदिवस शासनाच्या बदलत्या धोरणानुसार थेट पणन,खाजगी बाजार परवाना ,अशा विविध बाबीमुळे बाजार समित्यांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे अनेक बाजार समित्यांचे अधिकारी कर्मचारी यांना वेतन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे . 32 महिने बाजार समिती कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही ही खेदाची बाब आहे त्यावर लवकरच कार्यवाही करून यावर तोडगा काढण्यात येईल अशी खात्री पणन संचालक यांनी यावेळी दिली . ,जुनी पेशन योजना लागू करावी,थेट पणन खरेदीवर नियंत्रण कामी बाजार समिती कर्मचाऱ्यांचा समावेश व्हावा.अशा न्यायिक मागण्याचे निवेदन आज दिनांक 05/08/2024 रोजी पुणे येथे देण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन सातपुते सह, माजी अद्यक्ष श्री दिलीप डेबरे विदर्भातून प्रशांत शिंगणे, धनराज शिपणे,राजेश काकडे, कैलास तायडे कोकण विभागातून शैलेश देसाई,इतर बाजार समिती कर्मचारी संघाचे पदाधिकारी निवेदन देतेवेळी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *