https://vruttamasternews.com/sambhaji-nagar-news-2/
वडगाव-तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या: आरोपी पसार
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील वडगाव-तिसगाव रस्त्यावर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास कपिल सुदाम पिंगळे (वय २८, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि तपास सुरू केला. प्राथमिक तपासात समजले की, आरोपीने पिस्तूल घटनास्थळी टाकून तिथून पळ काढला आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून विविध दिशांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचालींविषयी माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना का घडली आणि आरोपी कोण होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. कपिलच्या कुटुंबियांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न करावे, अशी मागणी केली आहे.