https://vruttamasternews.com/sambhaji-nagar-news-4/
राज्यस्तरीय शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे समाज गौरव पुरस्काराने पत्रकार बाबासाहेब जाधव सन्मानित ……..!
बुलडाणा,(प्रतिनिधी)-
काल कथित शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांचं सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामधलं समर्पित योगदान सर्वश्रुत आहे. बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध धम्म उपासक, शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च नैतिक मूल्य प्रस्थापित करणारा शिक्षण संस्था चालक, समर्पित दानशूर समाजसेवक म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या विचाराचा व कार्याचा वारसा पुढे चालू राहावा या उदात्त हेतूने त्यांच्या नावाने हा राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार दिला जातो.
बुलडाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी त्यागर्ती स्मृतिशेष नागोराव जाधव गुरूजी यांचे चिरंजिव बाबासाहेब नागोराव जाधव यांना नुकताच महाकवी वामनदादा कर्डक व शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निळे प्रतिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार ‘शिक्षण महर्षी माधवराव बोरडे समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानाने त्यांच्या समाजसेवेतील अतुलनीय कार्याची दखल घेतली गेली आहे.
बाबासाहेब जाधव यांच्या वडिलांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांनी बाबासाहेबांना सांगितले की, “मला तुमच्यासोबत काम करायचे आहे.” त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना नोकरी सोडण्याची आवश्यकता सांगितली. समाजाच्या सेवेसाठी नागोराव जाधव गुरुजी यांनी तत्काळ नोकरीचा राजीनामा दिला आणि समाजकार्यात आपले आयुष्य समर्पित केले.निळी टोपी घालून,व्रतस्थ पणे पायाला भिंगरी बांधल्या ग त तत्कालीन रिपाईचे ज्येष्ठ नेते आदरणीय रासू गवई, बॅरिस्टर खोब्राकडे, दादासाहेब गायकवाड, शांताबाई दानी यांच्यासोबत अनेक आंदोलने केली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भूमिहीनाच्या आंदोलनाचा नेतृत्व आदरणीय दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली केलं त्यामधून प्रत्येक गावामध्ये भूमिहीनांना 12 एकरचे शेत मिळाले. 1960 च्या दशकामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी घर दाराचा विचार न करता अनवानी फिरून समाजामधील अंधश्रद्धाअज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वस्तीगृहाची स्थापना केली. सिंदखेडराजा पंचायत समितीचे ते पंधरा वर्षे सदस्य होते. आपल्या वडिलांचानिरपेक्ष समाजसेवेचा वारसा सुपुत्र बाबासाहेब जाधव आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून चालवत आहेत. या माध्यमातून त्यांनी वंचितांना न्याय मिळवून दिला. त्यांचे कार्य केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही व्यापक राहिले आहे. १९७६ पासून ते रामदास आठवले, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगाकर, बाबूराव कदम यांच्यासोबत विविध चळवळीत मागासवर्गिय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने,मोर्चे काढून न्याय मिळवून दिला सामाजिक धार्मीक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेत आहेत.
१९८८ पासून बाबासाहेब जाधव यांनी दरवर्षी एक लाख धम्मदान देण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यात अनाथालये, शाळांना शैक्षणिक मदत, बौद्ध विहारांना आर्थिक सहाय्य, विधवा गरीब स्त्रियांना साड्या वाटप यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. कोवीड काळातही त्यांनी गरीब जनतेला घरपोच एक लाख पन्नास हजार रुपयांची मदत केली.या सर्व कार्याची दखल घेत, निळे प्रतीक संस्थेने व शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठाण ने त्यांच्या कार्याची दखल घेतली व त्यांना ‘शिक्षण महर्षी माधवराव बोरडे समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. हा सन्मान त्यांच्या अनमोल कार्याची कृतज्ञता व्यक्त करणारा आहे.यावेळी विचार पिठावर न्यायधिस विजयकुमार कुमार गवई, निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे,सहाय्य्क पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के, जेष्ठ साहित्तीक विचारवंत प्रा डॉ. ऋषिकेश कांबळे, साहित्तीक विचारवंत डॉ. यशवंतराव खडसे, पोलीस निरीक्षक गौतम पातारें, तळेगाव दाभाडे पुणे च्या नगराध्यक्षा अँड रंजना भोसले, सामाजीक कार्यकर्ते आंबादास रगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बाबासाहेब जाधव यांना हा सोहळा १५ ऑगस्ट रोजी मौलाना आझाद संशोधन सभागृह संभाजी नगर औरंगाबाद मध्ये संपन्न झाला.