Sambhaji nagar अरे बापरे महिलेच्या पोटात निघाले 130 लहान मोठे खडे

https://vruttamasternews.com/sambhaji-nagar449-2/

अरे बापरे महिलेच्या पोटात निघाले 130 लहान मोठे खडे

संभाजी नगर/प्रतिनिधी

मुतखडा म्हटला की एखादं दोन असतील असे सर्व सामान्यना वाटते मात्र एका 78 वर्षीय महिलेच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल 130 मुतखडे काढण्यात आले घाटी रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागातील डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया केली विशेष म्हणजे अशा प्रकारच्या केसेसमध्ये 130 मुतखडे निघण्याची जगातील पहिलीच घटना असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. घाटीतील स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात चार जून रोजी शहरातीलच रहिवासी असली 78 वर्षी जेष्ठ महिला दाखल झाली त्यांचे मायांग बाहेर आले होते. मायांग बाहेर आल्यानंतरही त्यांनी वेगळीच उपचार घेतलेला नव्हता सूज वाढल्यामुळे आणि त्रास वाढल्यानंतर त्या घाटीत दाखल झाल्या तपासण्याअंती त्यांच्या लघवीच्या पिशवीत मुतखडे तयार झालेचे ही निदान झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला सव्वा दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियात मयांग आतमध्ये सरकवण्यात आले. गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. याचवेळी लघवीच्या पिशवीतून मुतखडे काढण्यात आले एक एक करून मुतखडे काढण्यात आले तेव्हा त्यांची संख्या पाहून डॉक्टर चकित झाले तब्बल 130 मुतखडे निघाले महिनाभरात चार जुलै रोजी या महिलेला घाटीतून सुट्टी देण्यात आली अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. कानन येळीकर, डॉ. रूपाली गायकवाड ,डॉ. रजनी कदम, डॉ. स्नेहल उंबरकर, डॉ. प्राची काठावी, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. गणेश निकम ,परिचारिका सुनीता आसवले, ब्रदर अतुल निर्मल यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली

 

78 वर्षीय महिलेच्या लघवीच्या पिशवी तयार झालेले 130 मुतखडे काढण्यात आले जगात यापूर्वी अशा 14 केसेस झालेल्या आहेत यात सर्वाधिक 30 मुतखडे काढले हे जगातील 15 प्रकरण आहे यात सर्वाधिक मुतखडे निघाले

——–

डॉ. श्रीनिवास गडप्पा श्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग प्रमुख घाटी संभाजी नग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *