Sambhajinagar news २ जुलैपासून इंडिगोची गोवा, नागपूर विमान सेवा

 

https://vruttamasternews.com/sambhajinagar-news/

 

संभाजी ननगर /प्रतिनिधी

२ जुलैपासून इंडिगोची गोवा, नागपूर विमान सेवा

संभाजी नगर / राजू गवई

इंडिगो विमान कंपनी २ जुलै पासून छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर व गोवा या ठिकाणी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या दोन नवीन मार्गांमुळे छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हीटी वाढली आहे.

 

लवकरच एअर एशियाची बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याने या विमानतळावर काही दिवसांत प्रवाशांसह विमानांची वर्दळ वाढणार आहे.

 

नुकतेच इंडिगो विमान कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर व गोवा या मार्गावर ७८ आसन व्यवस्था असलेली विमानसेवा २ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी सेवा देणार आहे. या दोन मार्गांवर विमानसेवा सुरू होणार असल्याने छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. येथून गोव्याला जाणारा तरुणवर्ग मोठा आहे. त्यामुळे या विमानाला प्रवासी मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान येथून गोवा आणि नागपूरसाठी सुरुवातीच्या काळात सुमारे ५ हजार रुपयांचे तिकीट दर असणार असून ते परिस्थितीनुसार कमी जास्त होते अशी माहिती इंडिगोचे येथील व्यवस्थापक अनुरूद्ध पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *