Sangli news महाराष्ट्र दलीत अत्याचार ग्रस्त झालाय भाई दीपक केदार यांचा गृहमंत्र्याला सवाल

https://vruttamasternews.com/sangli-news/

महाराष्ट्र दलीत अत्याचार ग्रस्त झालाय

भाई दीपक केदार यांचा गृहमंत्र्याला सवाल

 

सांगोला/प्रनितींधी

जातीयवादी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र दलित अत्याचारग्रस्त झाला आहे!

महूद सांगोला येते दलित नेता मातंग समाजाचे सुनील कांबळे यांची निर्घृण हत्याकांड झाले आहे. आज पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले, तरुणांच्या मोठ्या फौजफाट्यासहित ऑल इंडिया पँथर सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार गावात दाखल झाले यावेळी बोलताना भाई दीपक केदार म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र दलित अत्याचार वाढल्या असून महाराष्ट्र हा दलित अत्याचारांचा महाराष्ट्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात झाला आहे पुढे बोलताना भाई दीपक केदार म्हणाले

 

देवेंद्र फडणवीस हे अंबानीच्या लग्नाला जातात पण दलित हत्याकांड झाले तर भेट सुद्धा देत नाहीत, त्यांना दलितांची लाज वाटायला लागली आहे. मातंग समाजाला आमदारकी दिली म्हणून सांगता आणि मातंग समाजाच्या अत्याचारावर गप्प बसता? येवल्यात साडे तीन तास अर्धनग्न करून व्हिडीओ काढून मारहाण केली, सुनील कांबळेचे हत्याकांड केले. नवनिर्वाचित आमदार गोरखे स्वागत अन भाजपाचे गुणगान बंद करून मातंग हत्याकांडाला भेट द्यावी.

 

सर्व आरोपी अटक करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन तात्काळ आरोपीला फाशी द्या, पीडित कुटुंबला शासकीय नोकरीं, मुलांचे शिक्षण, 50 लाखांची मदत सरकारने करावी.

महाराष्ट्र दलित अत्याचारग्रस्त घोषित करून तात्काळ अन्याय थांबवला नाही तर मंत्रालयावर मोर्चा घेऊन येऊ.

 

पोलिसांना जमत नसेल तर सीआयडी मार्फत चौकशी करा अशी आमची भूमिका आहे.

 

यावेळी भीमराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बनसोडे यांनी जमा केलेला 25 हजार निधी पीडित कुटुंबाला देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *