Satara news चुकीच्या पद्धतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याने गौतमी पाटील मोजतेय शेवटच्या घटका

 

https://vruttamasternews.com/satara-news-434-2/

चुकीच्या पद्धतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याने गौतमी पाटील मोजतेय शेवटच्या घटका

#सातारा पाटण, सोनवडे : सौ. गौतमी शशिकांत पाटील यांची कुटुंबं नियोजन शस्त्रक्रिया चुकीची झाली. तिला त्रास होतोय हे ओरडून सांगत असताना डॉक्टरांनी हात पाय बांधून तोंडात बोळा घालून निर्दयी पणे अनेक तास ऑपरेशन केले. ऑपेरेशन झाल्यावर ती शुद्धीवर आल्यावर पुन्हा जोरात पोटात दुखायला लागले. डॉक्टरांनी सलाईन मधून पेनकिलर दिले आणि दोन दिवसाने तिला डिस्चार्ज सुद्धा दिला, पुन्हा दुखायला लागलं पुन्हा आणलं पुन्हा तेच सलाईन दिले.

 

हे सगळं घडलं सोनवडे सरकारी रुग्णालय येते, डॉ. ननावरे, डॉ. डुबल यांच्या हलगर्जीपणामुळे जे घडलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. आता त्यांच्या लक्ष्यात आलं कि काही खरं नाही तेव्हा सरकारी ऍम्ब्युलन्स मधून पाटण ला सोनोग्राफी साठी आणलं. तेथील डॉक्टरने पोट फुगलेले पाहून कराड गाटायला लावले. त्याच गाडीतून पेशन्ट नर्स सोबत सहित कराड येथील कॉटेज कुटीर हास्पिटल ला घेऊन गेले तिथेही केवळ पेनकिलर दिले. आता फरक कशाचाच पडत नव्हता, असाहाय वेदना वाढतच गेल्या, ज्यामुळे त्यांचं ऑक्सिजन लेव्हल कमी झालं आता गरज पडली व्हेंटिलेटरची तेव्हा सातारा सिव्हिल ला भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

 

सोनवडे सरकारी रुग्णालय ते सातारा सिव्हिल रुग्णालय इथपर्यँतचा प्रवास झाल्यावर कुटुंब समजून गेले कि हे कुणीच सोनोग्राफी करत नाहीत तेव्हा त्यांनी खाजगी दवाखान्याचा सहारा घेतला सह्याद्री हॉस्पिटल कराड येते नेलं. त्या हॉस्पिटलने परिस्तिथी पाहून पेशन्ट सिरीयस आहे म्हणत त्यांना कृष्णा हॉस्पिटल ला नेण्याचा सल्ला दिला. आता तेथेही पेशन्टची गंभीर स्तिथी पाहता सांगलीला भारती हॉस्पिटल ला नेले. तिथे पेशन्ट ऍडमिट केल आणि इलाज करणायास सुरवात झाली. यात दोन

 

तिला जाणवत होतं कि माझ्यासोबत काही तरी चुकीच घडलंय. तिला पोटात पुन्हा वेदना सुरु झाल्या आणि आता तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक प्रवास सुरु झाला. यात दोन दिवसाचा कालावधी गेला. या हॉस्पिटलला पेशन्टचे तपासणी केले. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली.

पोटात आताड्याला भोक पडून सगळीकडे इन्फेकशन झालं आणि त्यामुळे किडनी आणि लिव्हर ला मोठे इन्फेकशन झालं आहे.

 

त्यामुळं या डाक्टरांनी ऑपेरेशन करण्याचा निर्णय घेऊन ऑपरेशन केले. डॉक्टरांनी स्पष्टपने सांगितले कि कुटुंबं नियोजन ऑपरेशन चुकीचे झाले म्हणून तिच्या पोटातली ट्यूब काढून टाकली. त्यानंतर सुद्धा त्रास थांबलेला नाही.

ही घटना चिमूटपणे 20 मे ते आजपर्यँत कुटुंबं सहन करत आहे. डॉक्टरांनी तीन महिन्याने पुन्हा दुसरे ऑपरेशन करन्याचा सल्ला दिला आहे.

 

हा अन्याय माझ्या कानावर आला मी तात्काळ सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांना हे प्रकरण समजून सांगितलं. या जिगरबाज वाघाने तात्काळ पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि आंदोलन सुरु केले. गेली पाच दिवस आंदोलन सुरु होते, पाऊस येत होता पण हे वाघ पाण्या पावसात बसून राहिले. उपोषण सुरूच ठेवले,हि घटना खूप गंभीर होती म्हणून अतिशय मोठा संघर्ष केला. आदित्य गायकवाड यांनी अखेर आज एक जणांच्या निलंबनाची लढाई जिंकली आणि दोन जणांचे निलंबनसाठी चौकशी लावली.

 

गौतमी शशिकांत पाटिल अखेरच्या घटका मोजत आहे. इन्फेकशन एवढं वाढलं कि तिला मी जगणार नाहि अशी खात्री झाली. लेकरं, नवरा ती रडत असतात. आणि इकडे तिचे आयुष्य एका क्षणात उद्धवस्त करणारे आरोपी मोकाट आहेत.

ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. तात्काळ आरोपी निलंबीत करावे, राज्यसरकारने आरोग्य मंत्र्यांनी दखल घेऊन या मुलीला मोठ्या दवाखान्यात इलाज करून वाचवणयाचे प्रयत्न करावेत. पीडित कुटुंबंला शासकीय 25लाख रुपये शासकी

य मदत द्यावी.

पावसात लढून एक जणांचे निलंबन करायला भाग लढणाऱ्या वाघाना जयभिम!

 

ताई तू खचू नको,

तुझा भाऊ तुझ्यासोबत आहे…

फक्त तू खचू नको

#JusticeForGautami

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *