https://vruttamasternews.com/shevgav-news/
पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा शेवगाव वकील संघाची मागणी
शेवगाव, (प्रतिनिधी) शेवगाव
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या कार्यपध्दतीमुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही कामासाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाही. तसेच पोलीस निरीक्षक नेहमी मनमानी कामकाज करतात. पोलीस निरीक्षक भदाणे यांच्या कामकाजाची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन शेवगाव तालुका वकील संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांना देण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास
आंदोलन करण्याचा इशारा देण्यात सुरु आहेत. असे
निवेदनात म्हटले, तालुक्यामध्ये सर्वत्र अवैध धंद्यांचा सुळसुळात झाला आहे. तसेच दिवसाढवळ्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकरणांवर पोलीस प्रशासनाचा अंकुश राहिलेला नसून पोलीस ठाण्यात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. पोलिसांचे अभय असल्याने हे अवैध व्यवसाय राजरोजपणे
कामकाजानिमीत्त पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस अधिकारी वकील मंडळींना चांगली वागणूक देत नाहीत. तक्रार घेऊन गेलेल्या नागरिक व त्यांच्या बरोबर आलेल्या गांव पुढाऱ्यांना उद्घट भाषा वापरुन वकिलांचा ही अपमान करतात. याबाबत पोलीस निरीक्षक भदाणे यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाच्या वतीने करणात आली आहे.
निवेदनावर शेवगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.
रामदास बुधवंत, सचिव अॅड. संभाजी देशमुख, उपाध्यक्ष अॅड. विजय भेरे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अर्जुन जाधव, माजी अध्यक्ष अॅड.
कारभारी गलांडे, अॅड. मनोहर थोरात, अँड. शिवाजी भोसले, अॅड. अमोल वेलदे, अॅड. अभय कराड, अॅड. जयप्रकाश देशमुख, अॅड. ए.बी.शिंदे, अॅड. किरण अंधारे, अॅड. महेश आमले, अॅड. नामदेव गरड अॅड. रवींद्र सकट आदींसह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार