https://vruttamasternews.com/varshvas-news/
21जुलै आषाढ़ पूर्णिमा ते अश्विन पूर्णिमे पर्यंत तीन महीने धम्म संकल्प अभियानाचा शुभारंभ नागपुरातुन
नागपूर / प्रतिनिधी
आषाढ़ पौर्णिमा ही बुध्द धम्मात फार महत्वाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम बुद्धाने वाराणसी जवळ सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्खुंना धम्म शिकवून धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले.
धम्मचक्र प्रवर्तन सुत्रांची शिकवण पूर्ण झाल्यानंतर कौंडिल्य भिखु अरहंत झाले आणि ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाने मानव जातीला पहिल्यांदा धम्म शिकवला त्याच ठिकाणी आज धम्मेक स्तुप सुद्धा उभा आहे.
याच आषाढ़ पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा महामायेच्या उदरात भविष्यातील बुद्धांची गर्भधारणा झाली, बुध्द आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथात डॉ. बाबासाहेबांनी याचे वर्णन सुद्धा केले आहे.
त्याकाळी शाक्य लोक तसेच राजघराण्यातील मंडळी सुद्धा आषाढ़ महिन्यात येणारी ही पौर्णिमा एक महोत्सव म्हणुन सात दिवस साजरी करायचे आणि महत्वाचे म्हणजे याच आषाढ़ी पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला व याच आषाढ़ी पूर्णिमेच्या दिवशी बुद्धाने सारीपुत्राला अभिधम्म शिकविण्यास सुरुवात केली आणि आजही अनेक बुध्द राष्ट्रांमध्ये अभिधम्म शिकविण्यास याच आषाढ़ी पौर्णिमेपासून सुरुवात होते.
प्रत्येकवर्षी आषाढ़ पौर्णिमेला बौध्द भिक्खुंचा तीन महिण्यांचा वर्षावास सुरु होतो, वर्षावासाच्या काळामध्ये भिखु विहारांमध्ये वास्तव्यास असतात व धम्म प्रचारासाठी दूर अशा क्षेत्रांमध्ये दौरा करीत नाही. वर्षावासामध्ये एकाच ठिकाणी थांबण्याची सूचना बुद्धाने भिक्खुंना केली होती त्यामुळे आजही वर्षवासाच्या काळात भिक्खु एकाच विहारामध्ये आश्रयास असतात व जवळपासच्या परिसरातील उपासक भिक्खुंना सोयी पुरवतात व भिक्खु उपासकांना धम्म शिकवतात.
भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यात 45 वर्षावास पूर्ण केले.
या वर्षावासाच्या निमित्याने आषाढ़ पूर्णिमे पासून अश्विन पौर्णिमे पर्यंत तीन महीने लॉर्ड बुद्धा टिवी ने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 36 कार्यशील बुद्ध विहारात पांच प्रमुख भिक्षुंणा सोबत घेऊन धम्मदेसना, चिवरदान आणि भिखु संघ व उपासक यांच्या मधे धम्मा विषयी सविस्तर चर्चा संवाद घडवून आण्याचा प्रयत्न धम्म संकल्प अभियानाच्या माध्यमातून तीन महीने महाराष्ट्रातील वातावरण धम्ममय करण्याचा हा छोटासा प्रयत्न लॉर्ड बुद्धा टिवी करित आहे.
हा धम्मसंकल्प अभियान संपूर्ण महाराष्ट्रातुन Live थेट प्रक्षेपण आमच्या 22 राज्यातील प्रेक्षकांना घरबसल्या आपल्या केबल टिवी वर, मोबाइल वर आणि एंड्रॉइड टिवी वर निःशुल्क पाहता येणार आहे.
या धम्मसंकल्प अभियानाचा उदघाटन समारंभ रविवार 21 जुलै 2024 आषाढ़ पौर्णिमेच्या दिवशी भदंत हर्षबोधी (अध्य्क्ष, बौद्धगया चैरिटेबल ट्रस्ट) यांच्या हस्ते करण्यात येत आहे. वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, वरिष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर, रमेशजी बंसोड़, गोविंदजी पोद्दार, सुभाषजी बांते, संजयभाऊ मेश्राम, भैय्याजी खैरकर, रामदेवजी अग्रवाल, प्रदीप उबाळे पाटिल प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आंबेडकरी जनतेला घरी बसून आपल्या टिवी वर लाइव बघता येणार अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक सचिन मून, राजू मून, विकास जीवने, गजेंद्र गवई, सदाशिव गच्चे आणि महेश नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपला
सचिन मून
(संचालक)
Lord Buddha Tv